डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शिक्षण क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा आणि दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाली – तेजस्वी सूर्या

लोकसभेत आज शिक्षण मंत्रालयाशी संबंधित अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली. गेल्या १० वर्षात देशाच्या शिक्षण क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा आणि दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचं भाजपाचे तेजस्वी सूर्या यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. काँग्रेसचे मोहम्मद जावेद यांनी शाळा आणि महाविद्यालयांमधल्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला.  तर, केंद्र सरकारची धोरणं देशातला शिक्षणाचा दर्जा उंचावण्यामध्ये  अपयशी ठरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या प्रतिमा मंडल यांनी केला.

 

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजने अंतर्गत देशातल्या २ कोटी ८६ लाख कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आल्याचं ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं.  सौभाग्य योजने अंतर्गत देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रत्येक कुटुंबाला वीज जोडणी देण्यात आल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा