ब्रेथ एनलायझर संबंधात नवीन नियमांविषयी आज ग्राहक हित विभागाकडून माहिती देण्यात आली. वैध मापनशास्त्र अधिनियम २०११ अंतर्गत हे नवीन नियम लागू केले जातील. जे ब्रेथ एनलायझर पुरावा म्हणून वापरण्यात येतील, त्यांनी चाचणीच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करावं आणि अचूक निदान करावं यासाठी हे नियम आहेत. अशा यंत्रांची अचूकता निश्चित करण्यासाठी ते प्रमाणित करणं आवश्यक आहे. त्यामुळे रक्तातील अल्कोहोलची पातळी, रक्ताचा नमुना गोळा करण्याची प्रक्रिया वेगवान व्हायला मदत होईल. त्यासाठी या नियमात यंत्राच्या विविध चाचण्यांची तरतूद करण्यात आली आहे.
Site Admin | June 28, 2024 8:06 PM