मेजर ध्यानचंद यांची जयंती आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नुकत्याच आयोजित केलेल्या ‘खेल उत्सव २०२४‘ मध्ये क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडिअमवर झालेल्या या खेल उत्सवात मंत्रालयाचे २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
Site Admin | September 6, 2024 1:43 PM | Information and Broadcasting Ministry | Khel Utsav 2024