डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक

सरकारनं आज सांगितलं की पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक झाली आहे. यापैकी पंच्याऐंशी लाख टनांहून अधिक खरेदी पंजाबमधल्या राज्य संस्था आणि भारतीय अन्न महामंडळानं केली.  सरकारनं ठरविल्यानुसार ग्रेड ‘अ’ तांदळासाठीमधल्या घनिष्ठ भागीदारीचा आढावा घेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी ते सिंगापूरच्या नेतृत्वाचीही भेट घेतील. तेविसशे वीस रुपये या किमान आधारभूत किमतीवर धानाची खरेदी केली जात आहे असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. चालू खरीप हंगामात सरकारनं आतापर्यंत एकंदर १९ हजार८०० कोटी रुपयांची तांदूळ खरेदी केली आहे आणि त्याचा ४ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 

२०२४-२५ च्या खरीप हंगामासाठी १ ऑक्टोबरपासून पंजाबमध्ये तांदूळ खरेदी  सुरू झाली. शेतकऱ्यांकडून सुरळीत खरेदीसाठी २ हजार ९२७ नियुक्त मंडया आणि तात्पुरते यार्ड राज्यभर कार्यरत आहेत.  ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या मार्केटिंग हंगामासाठी केंद्र सरकारनं १८५ लाख टन तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा