घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्च महिन्यात कमी होऊन २ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. हा दर फेब्रुवारीत २ पूर्णांक ३८ शतांश टक्के इतका होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. घाऊक किंमत निर्देशांकातल्या गरजेच्या वस्तूंवरचा वार्षिक महागाई दर फेब्रुवारीतल्या २ पूर्णांक ८१ शतांशवरून खाली येऊन मार्चमध्ये ७६ शतांश टक्के इतका झाला आहे. तर, अन्न निर्देशांकाचा वार्षिक महागाई दर गेल्या महिन्यात ४ पूर्णांक ६६ शतांश टक्के होता, तो या महिन्यात ५ पूर्णांक ९४ शतांश टक्क्यांवर आला आहे.
Site Admin | April 15, 2025 3:45 PM | घाऊक किंमत निर्देशांक | वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्च महिन्यात कमी होऊन २ पूर्णांक ५ शतांश टक्क्यांवर पोहोचला
