कुशल कामगारांच्या वाढत्या मागणीसाठी कौशल्य वाढवण्यावर केंद्र सरकार काम करत आहे. येत्या वर्षभरात एक लाखाहून अधिक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं. कांदिवली इथं ‘कौशल्य विकास केंद्रा’चे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारतीय उद्योग महासंघ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्या सहकार्यातून या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.