७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत. २५ आणि २६ जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांच्या संबंधावर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
Site Admin | January 16, 2025 8:19 PM | 76th Republic Day | Indonesia | Prabowo Subianto