या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं. सुबियांतो यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य पाहुणे आहेत. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं.
आपल्या चार दिवसांच्या दौऱ्यात सुबियांतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष समारंभातही ते उपस्थित राहणार आहेत. सुबियांतो यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सूत्रं हाती घेतल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.