जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर फाईव्ह हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंची कामगिरी खराब झाली. मिश्र दुहेरीत भारताच्या तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांचा मलेशियाच्या पँग रॉन हू आणि सू यीन चेंग या जोडीने २१-१८,१५-२१,१९-२१ असा पराभव केला. पुरूष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या भारतीय जोडीवर थायलंडच्या जोडीने २२-२०, २३-२१ असा विजय मिळवला. पुरूष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतल्या सामन्यात भारताचा लक्ष्य सेन जपानच्या केंता निशिमोटोकडून पराभूत झाला आहे. लक्ष्य पहिला गेम १६- २१ असा हरला. दुसरा गेम त्यानं २१-१२ असा सहज जिंकला, पण निर्णायक चुरशीचा झालेला गेम त्यानं २३- २१ असा गमावला.
Site Admin | January 23, 2025 8:46 PM | Indonesia Masters Badminton