यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारण्याची घोषणा आणि सर्व स्तरांवर कर टप्प्यात फेरबदल केल्यामुळे 90 टक्क्यांहून अधिक वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सल्ला दिला आहे. कर व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारला अपेक्षित नसल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. आतापर्यंत 75 टक्के व्यक्तींनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे.
Site Admin | February 3, 2025 11:01 AM | taxpayers | कर | रवी अग्रवाल
वैयक्तिक करदात्यांना नव्या कर प्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे – रवी अग्रवाल
