गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्यक्ष चर्चा सुरु झाली आहे. हमासनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्यापक आणि अस्थायी संघर्ष विराम तसंच गाजामधून इस्रायली सैनिकांची माघार हे मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना त्वरित आणि सुरक्षितपणे माघारी आणण्याबद्दलही चर्चा होणार आहे. या चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ दोहा इथे पाठवल्याचं इस्राएलनं म्हटलं आहे. कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थीतून गेल्या एक वर्षापासून संघर्ष विरामाबाबत चर्चा सुरु आहे.
दरम्यान, गाजा पट्टीत हमासच्या ४० ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याची माहिती इस्राएलच्या संरक्षण दलानं दिली आहे. या हल्ल्यात काही दहशतवादी ठार झाल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.