जगातल्या सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत २०२४ या वर्षात नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नववा क्रमांक लागला आहे. एअरपोर्टस् काउन्सिल इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या यादीनुसार, गेल्या वर्षभरात या विमानतळावरून सुमारे ६ अब्ज ६६ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. २०२३ या वर्षाच्या तुलनेने ही वाढ ७ पूर्णांक ८ दशांश टक्के इतकी आहे. सर्वात व्यग्र विमानतळांच्या यादीत अमेरिकेतल्या हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा क्रमांक पहिला आहे. या विमानतळावरून गेल्या वर्षभरात ९ अब्ज २४ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.
Site Admin | April 16, 2025 1:40 PM | Indira Gandhi International Airport
व्यग्र विमानतळांच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नववा क्रमांक
