तरंग शक्ती या, देशातल्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावादरम्यान तेजस या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानानं जगातल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या बरोबरीनं आपल्या क्षमतेची झलक दाखवली. तमिळनाडूच्या सुलूर हवाई तळावर झालेल्या या सरावात राफेल, युरोफायटर टायफून यासारख्या परदेशी लढाऊ विमानांच्या जोडीनं तेजसनं भरारी घेतली. एकंदर ११ देशांच्या लष्करांनी या सरावात सहभाग घेतला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्सनं विकसित केलेलं तेजस हे त्याच्या प्रवर्गातलं सगळ्यात कमी वजनाचं लढाऊ विमान आहे.
Site Admin | August 13, 2024 7:55 PM | Tarang Shakti Exercise | Tejas