कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं, हा भारताचा दृष्टिकोन असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार लवकरच भारत ए आय मोहीम सुरु करणार असून त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय एक ए आय नवोन्मेष केंद्र देखील स्थापन केलं जाईल, ज्यामुळे उच्च दर्जाचे डेटा संच उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा स्टार्ट अप्स आणि संशोधकांना होऊ शकेल, असं ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता केंद्र सरकार एक कायदा तयार करत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
Site Admin | July 3, 2024 1:43 PM | Ashwini Vaishnav | Global India AI Summit-2024