महिला क्रिकेटमधे भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत आज राजकोट इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं सहा गडी, आणि ९३ चेंडू राखून विजय मिळवला. आयर्लंडन नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात फक्त ७ गडी गमावून २३८ धावा केल्या.. कर्णधार गॅबी लुईसनं ९२ तर लीह पॉलनं ५९ धावा केल्या. भारतातर्फे प्रिया मिश्रानं २, तर सायली सातघरे, दिप्ती शर्मा, टायट्स साधू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
विजयासाठी २३९ धावांचं लक्ष्य भारतानं ३५ व्या षटकातच ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. प्रतिका रावलनं ८९, तेजल हसबनीसनं नाबाद ५३ धावा केल्या. कर्णधार स्मृती मंधनानं ४१, धावांचं योगदान दिलं. रिचा घोषनं २ चेंडूत २ चौकार मारत भारताची धावसंख्या २४१ वर नेली.