भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसमधून या वर्षीच्या एप्रिल ते जुलै मध्ये एक्याऐंशी लाख कोटी रुपयांची देवघेव झाली. जगातल्या डिजिटल पेमेंट मंचांना मागे टाकत भारतात या माध्यमातून होणाऱ्या पैशाच्या देवाणघेवाणीमध्ये वार्षिक ३७ टक्के वाढ होत आहे. ग्लोबल पेमेन्ट हब पेसिक्युअरने दिलेल्या माहितीनुसार भारतात या माध्यमातून दर सेकंदाला ३ हजार ७२९ व्यवहार होतात.