2030 पर्यंत देशात 10 हजार भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग्ज मिळवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं.
GI संमेलनाला संबोधित करताना, हे लक्ष्य संपूर्ण सरकारी दृष्टिकोनातून साध्य केले जाईल आणि सरकार यावर देखरेख करण्यासाठी एक समिती स्थापन करणार असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. उद्योग विभागानं आतापर्यंत 605 भौगोलिक मानांकनं जारी केले आहेत.