डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर झालं आहे. त्यात नीरज चोप्रा, अविनाश साबळे, कुशोर कुमार जेना, सर्वेश कुशारे, अक्षदीप सिंह या पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. तर किरण पहल, पारुल चौधरी, ज्योती याराजी, प्रियांका गोस्वामी या महिला खेळाडूही या पथकात असतील. धावणे, भालाफेक, गोळाफेक, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, उंच उडी, रिले आणि मिश्र मॅरेथॉन अशा विविध खेळांमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरी गाठली होती.

 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या पथकातल्या खेळाडूंशी संवाद साधला. ऑलिम्पिक स्पर्धेतून फक्त विजयच नाही तर अनुभवही मिळतो. त्यामुळे खेळाडूंनी सगळे अडथळे, शंका बाजूला सारून फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सातत्य आणि परिश्रम यांच्या बळावर विजय मिळवावा, असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय खेळाडू हे आपलेच विक्रम मोडतील आणि आपला सर्वोत्तम खेळ दाखवून हे खेळाडू भारताचं नाव उज्ज्वल करतील अशी माझी खात्री आहे. २०३६ मध्ये ऑलिम्पिकचं यजमानपद भारताकडे असेल हे उद्दिष्ट ठेवून विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा