गेल्या दहा वर्षांत भारताची सौर उर्जा क्षमता ३२ पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर २०३०पर्यंत देश ५०० गिगा वॅट इतकी सौर उर्जा निर्मिती करेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्ली इथे आयोजित दोन दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. भारताने गेल्या काही वर्षांत हरित ऊर्जा निर्मितीत मोठी प्रगती केली आहे. भारतासह जगभरातही अनेक संस्कृतींनी सूर्याचं महत्त्व सांगितलं आहे. या महोत्सवाद्वारे सूर्याचा उत्सव साजरा करण्यात येत आहे, असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
Site Admin | September 5, 2024 1:42 PM | PM Narendra Modi | virtually addresses first International Solar Festival