अर्जेंटिना इथं सुरु असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मिटर रायफल स्पर्धेच्या महिला गटात काल भारताच्या सिफ्ट कौर साम्रा ने सुवर्णपदक पटकावलं तर पुरुष गटात आशियाई स्पर्धा विजेत्या चैन सिंग ने कांस्य पदक पटकावून भारताचं खात उघडलं आहे. भारताचा ऐश्वर्य प्रताप सिंग चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.