स्लोव्हेनियात सुरू असलेल्या एफईआय ड्रेसाज विश्वचषक अश्वारोहण स्पर्धेतल्या थ्री स्टार ग्रांड प्रिक्स मध्ये भारताच्या श्रुती वोरा हिने ऐतिहासिक विजय मिळवत पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. सीडीआय-३ इव्हेंटमध्ये प्रतिस्पर्धी मोलदोवाच्या तातियाना अँटोनेन्कोला पिछाडीवर टाकत तिने ६७.६१ गुण मिळवले. भारतीय अश्वारोहकांसाठी ही मोठी बातमी असून श्रुतीच्या प्रेरणादायी कामगिरीचा देशाला निश्चितच अभिमान वाटतो, अशी भावना भारतीय अश्वारोहण महासंघाचे सचिव जनरल कर्नल जैवीर सिंग यांनी व्यक्त केली आहे. श्रुती ने यापुर्वी २०२२ च्या ड्रेसेज विश्व कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसंच २०१०,२०१४ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे.
Site Admin | June 14, 2024 10:11 AM | GrandPrixWinner | Shruti Vora | win | World Equestrian Championships