ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या मेलबर्न इथं आज झालेल्या सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची शुआई झांग जोडी विजयी ठरली. पहिल्या फेरीत या जोडीनं क्रोएशियाचा इवाना डोडिग आणि फ्रान्सची क्रिस्टीना म्लादेनोविक या जोडीचा ६-४,६-४असा पराभव करत पुढची फेरी गाठली.
ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या दुहेरी प्रकारात रोहन पराभूत झाला होता. परंतु मिश्र दुहेरी स्पर्धेत झांगबरोबर रोहननं चांगली कामगिरी बजावली. मिश्र दुहेरीत या दोघांनी एक तास १२ मिनिटांचा खेळ करत प्रतिस्पर्धी जोडीला पराभूत केलं.