देशाच्या किरकोळ चलनफुगवट्याच्या दरात ऑगस्ट महिन्यात किंचित वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये तीन पूर्णांक सहा दशांश टक्के असलेला हा दर ऑगस्टमधे तीन पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. गेल्या पाच वर्षातला हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात कमी दर आहे. हा दर रिझर्व बँकेच्या २ ते ६ या नियंत्रण कक्षेत आहे.
Site Admin | September 13, 2024 2:32 PM | Retail inflation