भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंटचं प्रमाण येत्या २०३० सालापर्यंत दुप्पट होऊन सात लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.केर्नी आणि अमेझॉन पे या संस्थांनी शहरी भारत कसं पेमेंट करतो, यासंदर्भात केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानंतर हा अंदाज व्यक्त केला आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये किरकोळ व्यवहारांसाठी भारतातलं डिजिटल पेमेंट वाढून तीन पूर्णांक सहा लाख कोटी डॉलर झालं आहे.भारतात यूपीआय व्यवहार ११ एप्रिल २०१६ पासून सुरु झाले.भारताची ई-कॉमर्स बाजारपेठ २०२२ मध्ये ७५ ते ८० अब्ज डॉलर होती, त्यात २०३० पर्यंत २१ टक्के वृद्धी होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.