डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 17, 2024 2:11 PM | China

printer

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत पहिल्या फेरीत बाद

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताचा प्रियांशू राजावत आज पहिल्या फेरीत बाद झाला. प्रियांशूला कॅनडाच्या ब्रायन यांगने सरळ गेममध्ये पराभूत केलं. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या सामन्यात उद्या भारताच्या किरण जॉर्जचा सामना जपानच्या केंटा निशिमोटोशी होईल. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सामिया इमाद फारुकी हिचा सामना स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरशी होईल. तर मालविका बनसोड हिचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याशी होणार आहे.

 

आकर्शी कश्यप ही चिनी तैपेईच्या चिऊ पिन चियान हिच्याशी लढत देईल. महिला दुहेरी प्रकारात गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली उद्या चिनी तैपेईच्या हसिह पेई शान आणि हंग एनत्झू यांच्याविरुद्ध आपला पहिला सामना खेळतील. रुतपर्णा आणि श्वेतपर्णा पांडा या दोघीही पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या तेंग चुन हसन आणि यांग चू युन यांच्याशी लढत देतील. मिश्र दुहेरी प्रकारात भारताची एन. सिक्की रेड्डी आणि बी. सुमीत रेड्डी ही जोडी मलेशियाच्या लाई पेई जिंग आणि टॅन कियान मेंग यांच्याविरुद्ध खेळणार आहे. तर सतीश कुमार करुणाकरन आणि आद्या वरियाथ उद्या पहिल्या सामन्यात मलेशियाच्या तांग जी चेन आणि ई वेई तोह यांच्याविरुद्ध खेळतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा