डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीच्या मिश्रप्रकारात भारताची जोडी आज कास्य पदकासाठी लढणार

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये काल नेमबाजीमध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या मानू भाकर आणि सरबज्योत सिंह यांच्या जोडीने उत्तम कामगिरी केली असून ते कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. आज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १ वाजता त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे.

 

हॉकी मध्ये काल पूल बी सामन्यात भारताचा सामना अर्जें‍टीना संघाशी होऊन तो बरोबरीत सुटला. आज भारतीय हॉकी संघाचा पुढील सामना आयर्लंड शी होणार आहे.

 

बॅडमिंटन मध्ये भारतीय मानकीत खेळाडू लक्ष्य सेन याने पुरुष एकेरी मध्ये ग्रुप एल मधील काल झालेल्या सामन्यात बेल्जियमच्या जूलियन कैरागी याला 21-19, 21-14 ने हरवून आपला पहिलं विजय नोंदवला. लक्ष्य सेन चा पुढील सामना आज आशियाई विजेता जोनाथन क्रिस्टी याच्याशी होईल. बॅडमिंटन पुरुष दुहेरी मध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे . ऑलिंपिक स्पर्धांमध्ये या फेरीत प्रवेश करणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा