भारताची अण्विक वीजनिर्मिती क्षमता येत्या पाच वर्षात सुमारे ७० टक्क्यापर्यंत वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्लीत अणूऊर्जा विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी अणूऊर्जा आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीची माहिती दिली. सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला, आणि आगामी योजनांसंदर्भात निर्देश दिले.
Site Admin | June 25, 2024 8:29 PM | Dr. Jitendra Singh