विश्वचषक खोखो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून आपापल्या गटात दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं काल भूतानवर ७१-३२ असा विजय मिळवला. तर महिला संघानं मलेशियावर १००-२० अशी मात केली.