खो खो विश्वचषक स्पर्धेत, भारतीय पुरुष संघानं काल नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेला ६२विरुद्ध ४२ गुणांनी हरवून अंतिम फेरी गाठली. आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना नेपाळसोबत होईल.
तत्पूर्वी, भारतीय महिला संघानं विजयी घोडदौड सुरू ठेवत दक्षिण आफ्रिकेला ६६ विरुद्ध १६ अशा फरकानं पराभूत केलं. आता भारतीय महिला संघ देखील अंतिम फेरीत नेपाळसोबत लढणार आहे.