भारत आणि बांगलादेश या दोन संघांदरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज दिवसअखेर भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिवस संपला तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद, ८१ धावा झाल्या होत्या. रिषभ पंत आणि शुभमन गिल आज नाबाद राहिल्यानं उद्या फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
तत्पूर्वी, भारतानं पहिल्या डावात ३७४ धावा केल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशच्या संघाला सर्वबाद, १४९ धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराहनं चार गड्यांना तंबूत धाडलं, तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करून सामन्यातलं भारताचं स्थान भक्कम केलं.बांगलादेशच्या संघाला सर्वबाद, १४९ धावा कसोटी सामन्याच्या आज दिवसअखेर भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे.