डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत.

टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज रोमानियाविरुद्ध लढत देत आहेत. ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेच्या पहिल्या फेरीत किरण पहल, तर ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत आशियाई स्पर्धेतला सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे भारताचं प्रतिनिधित्व करतील. कुस्तीच्या मैदानात महिलांच्या ६९ किलो वजनी गटात उपउपांत्यपूर्व निशा दहिया मैदानात उतरेल. नौकानयन स्पर्धेत विष्णू सरवनन आणि नेत्रा कुमनन पुढच्या फेरीत जाण्यासाठी प्रयत्न करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा