पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं कास्यपदक पटकावण्याचं स्वप्न मलेशियाच्या झी जिया ली याच्यामुळे भंगलं. सुरुवातीचा गेम जिंकून घेतलेली आघाडी लक्ष्य सेनला टिकवता आली नाही आणि ली यानं नंतरचे दोन्ही गेम्स जिंकून सामनाही १३-२१, २१-१६, २१-११ असा खिशात घातला. नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका यांचंही कास्यपदक अवघ्या एका गुणानं हुकलं. त्यामुळे भारताला चौथ्या पदकासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
टेबल टेनिस सांघिक प्रकारात श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत यांनी रोमानियाच्या ३-२ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं.
Site Admin | August 5, 2024 8:24 PM | Lakshya Sen | Paris Olympic 2024