डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 22, 2024 3:40 PM | RBI | Shashikant Das

printer

गुंतवणुकीची मागणी वाढल्यामुळे भारताचा विकास अबाधित – आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास

उत्पादनांचा वापर आणि गुंतवणुकीची मागणी वाढत असल्यामुळे भारताची विकास वाटचाल अबाधित असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रिझर्व बँकेच्या मासिक अहवालात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा वास्तविक स्थूल उत्पादन वाढीचा दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहील, असा अंदाज असल्याचं, यात म्हटलं आहे. कृषी क्षेत्राबाबतचा सुधारित दृष्टिकोन आणि ग्रामीण भागातली वाढती मागणी, या पार्श्वभूमीवर उत्पादनांच्या खासगी वापरला चालना मिळणार असून, सेवांमधली सातत्यपूर्ण वाढ शहरी भागातल्या मागणीला पूरक ठरणार असल्याचं यात म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर साडेचार टक्के राहील, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा