एचडीएफसी बँकेचे माजी अध्यक्ष दीपक पारेख यांनी २०२५साठी भारताचा विकास दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा दर जागतिक सरासरीच्या दुप्पट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. इंडियन पीपल्स फोरम:बिझनेस अँड प्रोफेशनल कौन्सिल- संयुक्त अरब अमिरातीद्वारे आयोजित ‘इंडियाज रोडमॅप टू २०३०’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात विकास दर ६ पूर्णांक ७ टक्क्यांवर जाण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. परवडणाऱ्या घरांसाठी प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.यावेळी दुबईतले भारताचे महावाणिज्यदूत सतीश सिवन यांनी द्विपक्षीय व्यापार ८५ अब्ज यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचला असल्याचं सांगितलं.