डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारताचा जीडीपी वाढीचा दर ७ टक्के राहील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्ष २०२४-२०२५ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा दर वीस शतांशांनी वाढून ७ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही नाणेनिधीने आपल्या वर्ल्ड इकोनॉमिक आऊटलूकमध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचा अंदाज ३० शतांशांनी वाढवून ६ पूर्णांक ८ दशांश टक्के केला होता.

 

संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या निरीक्षणात, भारताच्या ग्रामीण भागात खासगी खर्चामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेमुळे हा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भारत ही जगातली सर्वात वेगवान विकासाभिमुख अर्थव्यवस्था असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा