रिझर्व्ह बँकेनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, १९ जुलैला संपलेल्या सलग तिसऱ्या आठवड्यात परदेशी चलन गंगाजळीत भर पडल्यानं भारताचा परदेशी चलन साठा ६७१ अब्ज डॉलर्स या आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यापूर्वीच्या सलग दोन आठवड्यांमध्ये मिळून परदेशी चलन गंगाजळीत जवळपास १५ अब्ज डॉलर्सनी वाढ झाली होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताची चालू खात्यातली तूट सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीच्या ७ टक्के म्हणजेच २३ पूर्णांक २ दशांश अब्ज डॉलर्सनी कमी झाली होती. ही आकडेवारी देशाची परदेशातील व्यापाराची स्थिती चांगली असल्याचं द्योतक आहे.