डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 30, 2024 2:54 PM | FDI

printer

देशातल्या परकीय चलन साठ्यात ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ

देशातल्या परकीय चलन साठ्यात ७०० अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहचला आहे. २०१४ ते २०२४ या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे सातशे नऊ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत २०१४ साली ७१व्या स्थानी होता, २०१८ साली भारत ३९ व्या स्थानी पोहचला आहे. लॉजिस्टिक्स, नवोन्मेष, सुरक्षा तसंच सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान व्यवसाय सुलभता निर्देशांकात ४२ क्रमांकावर झेप घेतली असून भारत गुंतवणुकीसाठी एक प्रमुख केंद्र बनला आहे. २०२४ मध्ये, भारत चीननंतर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा उत्पादक देश आहे. मोबाईल फोन उत्पादनातही देशानं दुसरं स्थान मिळवलं आहे. जागतिक शैक्षणिक क्रमवारीत देशानं लक्षणीय प्रगती केली असून यावर्षीच्या क्यूएस जागतिक आशिया विद्यापीठ क्रमवारीत भारताच्या सात संस्थांनी पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा