डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये भारतातली पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारली जाणार

देशाची कृषी निर्यात आणि आयात क्षमतेला चालना देण्यासाठी जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये भारतातली पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारली जाणार आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सार्वजनिक-खासगी तत्त्वावर हे आयात-निर्यात आणि स्थानिक कृषी मालावर आधारित प्रक्रिया आणि साठवणी सुविधा केंद्र विकसित करायला मंजुरी दिली असून, त्यासाठी २८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

या सर्वसमावेशक कृषी सुविधेच्या उभारणीमुळे लॉजिस्टिक सुविधा सुलभ होईल, अपव्यय कमी होईल आणि कृषी मालाला चांगला दर मिळेल, असं सोनोवाल म्हणाले. शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि भारताच्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी हे महत्वाचं पाऊल ठरणार असून, बिगर-बासमती तांदूळ, मका, मसाल्याचे पदार्थ, कांदा आणि गहू यासारख्या प्रमुख उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळेल असं सोनोवाल यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा