भारतातल्या पहिल्या बायो-बिटूमेन सामग्रीचा वापर करून बांधलेल्या नागपूर- मनसर बायपास महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बिटुमेन सारख्या सामग्रीचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणपूरक रस्त्यांमुळे रस्तेबांधणीचा खर्च कमी होईल तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळेल, तसंच प्रदूषणालाही आळा बसेल असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं. पिकांच्या अवशेषांपासून तयार झालेल्या बिटुमेनच्या वापरापासूनपासून निर्मित हा देशातला पहिला महामार्ग असून तो पारंपरिक डांबरी रस्त्यापेक्षा ४० टक्क्यांनी मजबूत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. नागपूर मनसर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पातही डांबरामध्ये बायो बिटुमेनचे 15 टक्के मिश्रण करून एक किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आल्याचीं माहिती गडकरी यांनी दिली. या रस्त्याचं काम केंद्रीय रस्ते संशोधन संस्था आणि पुण्याच्या बॉयोटेक फर्म प्राज उद्योगसमूहाच्या सहकार्यानं बांधण्यात आला आहे. यावेळी जैवनैसर्गिकवायू सारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून शेतकऱ्यांनी कृषी कचरा आणि बांबूपासून जैवनैसर्गिक वायू तयार करण्याचं आवाहनही गडकरी यांनी केलं.
Site Admin | December 22, 2024 1:17 PM | Bio-Bitumen | National highway