चालू आर्थिक वर्षात ८०० अब्ज डॉलर्स निर्यातीचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात प्रक्रिया, तसंच निर्यातदार आणि बँकांना सहाय्य पुरवण्यासाठी असलेल्या एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पेटंट्स, डिझाइन्स आणि ट्रेडमार्कचे नियंत्रक आदी संस्थांच्या कामाचा आढावा गोयल यांनी सांताक्रूझ इथं एका बैठकीत घेतला.
तंबाखू उत्पादक शेतकरी आणि तंबाखू उद्योगाशी संबंधित इतरांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन गोयल यांनी काल हैद्राबाद इथं दिलं. तंबाखू उत्पादकांच्या प्रतिनिधी मंडळाशी ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांविषयी सहानुभूती असून शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तंबाखूच्या अतिरिक्त उत्पादनावर आकारण्यात येणार दंड माफ करण्याचाही प्रयत्न आपण करु असं गोयल यांनी सांगितलं.