रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारतानं भर दिला आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या दोन दिवसांच्या युक्रेन शांतता परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव पवन कपूर सहभागी झाले होते. या परिषदेत त्यांनी भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला. या परिषदेतल्या विचारविनिमयानंतर प्रकाशित करण्यात आलेल्या कोणत्याही परिपत्रकाबाबत सहमती दर्शवण्यास भारतानं नकार दिला आहे. भारताचा या परिषदेतला सहभाग या संघर्षावर चर्चेतून कायमस्वरुपी, शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या दृष्टीकोनाला अनुसरुन होता असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | June 17, 2024 11:04 AM | युक्रेन शांतता परिषद | रशिया युक्रेन
रशिया युक्रेन संघर्षावर चर्चा आणि राजकीय धोरणांद्वारे कायमस्वरुपी शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारताचा भर
