भारताचं संरक्षण क्षेत्र आता स्वयंपूर्णतेच्या मार्गावर असून निर्यात क्षमताही वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका संरक्षणविषयक परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते. मोदी सरकारने सैन्यदलाच्या आधुनिकीकरणावर नेहमीच भर दिला आहे, असं ते म्हणाले. संरक्षण क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने २०२५ हे वर्ष ‘सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
या परिषदेत लष्करी क्षेत्रातली तांत्रिक प्रगती, धोरणात्मक सुधारणा, स्वदेशी उत्पादन, निर्यात आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर चर्चा होणार असून वरिष्ठ लष्करी अधिकारी, सरकारी प्रतिनिधी, संशोधक आणि उद्योजक यात सहभागी होत आहेत.