संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक खर्चासाठी भारतानं ३ कोटी ७६ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर्सचं योगदान दिलं आहे. नियमित पणे योगदान देणाऱ्या ३५ देशांमध्ये भारताची गणना होते.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी कालच्या वार्ताहर परिषदेत भारताच्या नियमितपणाची प्रशंसा केली आहे.