अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्देन या जोडीला काल तिसऱ्या फेरीत मॅक्सिमो गोन्झालेस आणि आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीकडून १-६, ५-७ असा थेट सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.
मिश्र दुहेरीत मात्र रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियाची साथीदार ॲल्डिला सुत्जियादी या जोडीचं स्पर्धेतलं आव्हान कायम आहे. दरम्यान, महिला एकेरीत गतविजेत्या कोको गॉफला एमा नावारो हिनं ६-३, ४-६, ६-३ असं नमवलं.