पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झालेला भारतीय धावपटू अविनाश साबळे यानं काल डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. पॅरिसच्या चार्लेटी मैदानावर झालेल्या स्पर्धेत अविनाशने ८ मिनिटं , ९ सेकंद आणि ९१ मायक्रोसेकंदां मध्ये अंतर पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमासह अविनाशला स्टीपलचेस प्रकारात सहावं स्थान मिळवता आलं. जुना राष्ट्रीय विक्रमही अविनाशच्या नावावर नोंदला आहे. दोन वर्षांपूर्वी अविनाशनेच बर्मिंघमच्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेस प्रकारात ८ मिनिटं आणि ११ सेकंद २० मायक्रोसेकंद असा विक्रम केला होता.
या स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू किशोर जेना याने ७८मीटर१०सेंटी मीटर लांब भाला फेकत स्पर्धेत आठवं स्थान मिळवलं. दरम्यान, याच स्पर्धेत केनियाची धावपटू फेथ किपेगोन हिने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिच्या स्वतःचा विक्रम मोडला. तिने हे अंतर अवघ्या ३ मिनिटं आणि ४९ सेकंद आणि ०४ मिनिसेकंदांत पार केलं. तिचा यापूर्वीचा इटली इथला विक्रम ८०० मीटर धावणे प्रकारातला असून ते अंतर तिनं २ मिनिटं ४ सेकंदांत पार केलं होतं. केथ हिने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवलं असून तीन वेळा जागतिक अजिंक्यपदाची मानकरी ठरली आहे.