ब्राझीलमध्ये सुरु मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं काल इटलीच्या जियानलुइगी मलंगाचा ५-० असा पराभव केला. जामवालचा अंतिम फेरीचा सामना आज ब्राझीलच्या युरी रीसशी होणार आहे.
तर, ७० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या हितेशची लढत इंग्लंडच्या ओडेल कामाराशी होईल. हितेशने फ्रान्सच्या माकन त्राओरवर ५-० असा शानदार विजय मिळवला होता.
यापूर्वी, मनीष राठोडने ५५ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकलं आहे.
Site Admin | April 5, 2025 1:58 PM | अभिनाश जामवाल | मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धा
मुष्ठियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालचा पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश
