डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 17, 2024 2:03 PM | #ParisOlympics2024.

printer

पॅरिस पॅरालिम्पिक खेळांसाठी भारताचा ८४ खेळाडूंचा चमू रवाना

पॅरिस इथं सुरू होत असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा, ‘८४ खेळाडूंचा चमू’ काल रवाना झाला. या चमूतल्या ५० क्रीडापटूंना ऑलिम्पिक साठी विशेष प्रशिक्षण योजनेचा फायदा झाल्याचं, तसंच यापैकी अनेक क्रीडापटू खेलो इंडिया स्पर्धेतून पुढे आल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या खेळाडूंना निरोप देताना सांगितलं. २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात टोक्यो पॅरालिम्पिकचा सुवर्णपदकविजेता सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव यांच्या खांद्यावर भारताचा ध्वज असेल. टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या चमूनं १९ पदकं पटकावली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा