डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी.व्ही सिंधूसह ४ खेळाडू उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

लखनौ इथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने भारताच्या इरा शर्मा हिचा २१-१०, १२-२१, २१-१५ असा पराभव केला. याच प्रकाराच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या उन्नती हुडा हिने पोर्नपिचा चोईकीवोंग हिचा २१-१८, २२-२० असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

 

या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या मीराबा लुवांग मैसराम आणि आयुष शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मीराबा याने सहाव्या मानांकित आयर्लंडच्या नट गुयेन याचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. तर आयुष याने मलेशियाच्या जस्टिन होह याला २१-१२, २१-१९ असं नमवलं. दरम्यान, आज भारताचा लक्ष्य सेन हा इस्रायलच्या डॅनिल डुबोवेंको याच्याविरुद्ध खेळणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा