पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर भारतीय महिला पैलवान विनेश फोगाट हिनं आज आपल्या निवृत्तीची घोषणा केली. समाजमाध्यमावर पोस्ट करत आपण सर्व चाहत्यांच्या आणि देशवासियांच्या कायम ऋणात राहू असं विनेशनं म्हटलं आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात तिने क्रीडा लवादाकडे अपिल केलं असून आपल्याला संयुक्तपणे रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.
Site Admin | August 8, 2024 12:44 PM | #ParisOlympics #IndiaAtParis #Paris2024 | vinesh phogat