पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कुस्तीपटू अमन सहरावत याने ५७ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने अल्बेनियाच्या झेलिमखान अबाकारोव्ह याचा १२-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत सहरावतचा सामना जपानच्या रेई हिग्युची याच्याशी आज रात्री पावणे दहा वाजता होणार आहे.
पुरुष हॉकी संघाची कास्य पदकासाठी स्पेन बरोबर लढत सुरू असून भालाफेकपटू नीरज चोप्रा आज पदकासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नीरज चोप्राचा सामना रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल.
दरम्यान, भारताची वेटलिफ्टर मिराबाई चानु ४९ किलो वजनी गटात चौथ्या स्थानावर राहिली. धावपटू अविनाश साबळे याला पुरुषांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेज प्रकारात अकराव्या स्थानावर तर महिलांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योती याराजी हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.